indian-railway

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. एसी चेअर कार्ट असणाऱ्या रेल्वेंच्या तिकीट दरांमध्ये सवलत लागू करण्याचा अधिकार विभागीय रेल्वेला सोपवला आहे. यानंतर वंदे भारतसह सर्वच गाड्यांच्या एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे २५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे.

कोणती आहे योजना?

ही योजना AC चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असणाऱ्या सर्व रेल्वेंना लागू होणार आहे. यामध्ये अनुभूती आणि व्हिस्टाडोम कोच असणाऱ्या रेल्वे; तसेच वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या डब्यांमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Mumbai News : सीएसएमटीमधील हेरीटेज रेल्वे इंजीन्स लोणावळ्यात शिफ्ट होणार; कारण...

या योजनेमध्ये तिकीटाच्या मूळ भाड्यावर जास्तीत जास्त २५ टक्के सूट देण्यात येईल. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी असे इतर शुल्क स्वतंत्र्यपणे आकारले जाईल. ही सवलत उपलब्धतेनुसार सर्व प्रवाशांना देण्यात येईल.

तात्काळ लागू होणार

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. अर्थात, ज्यांनी आधीच तिकीट बुक केले आहे अशा प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

अशा प्रकारे ठरवणार रेल्वे

गेल्या ३० दिवसांमध्ये ज्या रेल्वे गाड्यांमध्ये ५० टक्क्यांहून कमी प्रवाशांनी प्रवास केला आहे, अशा रेल्वेंना या सवलतीसाठी विचारात घेतले जाईल. सवलतीचे प्रमाण ठरवण्यासाठी वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या इतर वाहनांचे भाडे विचारात घेतले जाईल.

प्रवासाच्या पहिल्या, शेवटच्या किंवा मधल्या टप्प्यांनाही या सवलतीसाठी विचारात घेतलं जाईल. आवश्यकतेनुसार त्या-त्या टप्प्यांमध्ये किंवा संपूर्ण प्रवासादरम्यान (जिथे ५० टक्क्यांहून कमी प्रवासी असतील) ही सवलत दिली जाईल.

ट्रेनच्या मूळ स्थानकाचे जे झोन आहे, तेथील PCCM ने ठरवल्यानुसार या सवलतीचा कालावधी बदलला जाऊ शकतो. एकदा लागू केल्यानंतर कमाल सहा महिन्यांपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. ही सवलत ठराविक दिवसांसाठी, हंगामासाठी वा आठवड्यांसाठी लागू करण्याचा अधिकार PCCM ला राहील.

सवलत दिलेल्या रेल्वेंचे निरीक्षण करण्यात येणार असून, गरजेनुसार सवलत वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते. किंवा मग गरज भासल्यास ही सवलत रद्दही केली जाऊ शकते. याबाबत निर्णय घेतल्यानंतर तात्काळ स्वरुपात तो लागू होईळ.

तात्काळ टिकीट नाही

ज्या रेल्वेंना पहिल्या टप्प्यापासून शेवटपर्यंत अशी सवलत लागू केली जाईल, त्यांमध्ये तात्काळ पद्धतीने तिकीट बुक करता येणार नाही. तसेच, जर एका विशिष्ट टप्प्यासाठी सवलत लागू केली असेल, तर त्या टप्प्यासाठी तात्काळ तिकीट काढता येणार नाही.

कोणाला मिळणार नाही सवलत?

PTOs वरील तिकीटे, रेल्वे पास, सवलतीचे व्हाऊचर, आमदार/माजी आमदार कुपन, वॉरंट, खासदार/माजी खासदार, स्वातंत्र्यसैनिक आदी तिकिटांना सवलत मिळणार नाही.

 Best Courses after Graduationनवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp Group ला join करा