aadhaar-pan-linking

Aadhaar-PAN link : एक हजार लेट फीस देऊन पॅन बायोमेट्रिकच्या आधारे जोडण्याची अखेरची तारीख 30 जून होती. ज्या टॅक्सपेयर्सने या तारखेपर्यंत दोन्ही लिंक केलेलं नाही. ते इन्कम टॅक्संबंधित काही सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत.1 जुलै 2023 पासून, पॅन आधारशी लिंक न केलेल्यांचे पॅन निष्क्रिय होईल. 

या लोकांचा TDS आणि TCS हाय रेटवर कापला जाईल आणि इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 नुसार, सर्व पॅन धारक जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत त्यांनी त्यांचा पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे पॅन अ‍ॅक्टिव्ह केले जाऊ शकते दंड भरल्यानंतर, टॅक्सपेयर्स त्यांचा पॅन अ‍ॅक्टिव्ह करू शकतो. ही प्रक्रिया नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) पोर्टलवर चलन क्रमांक ITNS 280 अंतर्गत मेजर हेड 0021 आणि मायनर हेड 500 (इतर पावत्या) सह पैसे भरुन केली जाऊ शकते. 

ITRs ची प्रक्रिया लिंक न करता होणार नाही PAN ला बायोमेट्रिक आधारशी जोडल्याशिवाय आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य असले तरी, आयकर विभाग आयटीआरवर प्रक्रिया करणार नाही जोपर्यंत दोन्ही लिंक होत नाहीत. शुक्रवारी, प्राप्तिकर विभागाने सांगितले की, ज्या व्यक्तींद्वारे कंसेट देऊन आणि शुक्ल भरुनही पॅन आधार जोडले गेलेले नाही त्यांच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर विचार केला जाईल. 

एका ट्विटमध्ये, प्राप्तिकर विभागाने म्हटले होते की, पॅन धारकांना आधार-पॅन लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्या आहेत. विभागाकडून सांगण्यात आले की, 'या संदर्भात, अशी माहिती देण्यात आली आहे की, लॉग इन केल्यानंतर पोर्टलच्या 'ई-पे टॅक्स' टॅबमध्ये चलन भरण्याचे स्टेटस तपासले जाऊ शकते. पेमेंट यशस्वी झाल्यास, पॅन धारक आधारशी पॅन लिंक करण्यासाठी पुढे जाऊ शकतो. 'aadhaar pan link'

Aadhaar-PAN-linking

 Best Courses after Graduationनवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp Group ला join करा

काय आहेत नियम

1 जुलै 2023 पासून आधारकार्डाशी पॅन संलग्न न केल्यास Pancard link पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. याशिवाय उच्च रकमेचा टीडीएस कापला जाईल. आयकर अधिनियम 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी पॅन आधारशी संलग्न करणे अनिवार्य राहणार आहे. भूर्दंड भरल्यानंतर करदाता आपले पॅन पुन्हा सुरू करू शकणार आहेत. ही प्रकि'या नॅशनल सिक्युरिटी डिपॉझीटरी लिमिटेडच्या पोर्टलवर चालान सं'या आयटीएनएस 280 अंतर्गत प्रमुख शीर्ष 0021 (कंपन्यांव्यतिरिक्त आयकर) आणि लघु शीर्ष 500 अंतर्गत (इतर रिसिट्स) रक्कम भरून करता येईल. 

अशा प्रकारे पॅन पुन्हा सक्रिय करा28 मार्च 2023 ला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अंतर्गत जारी अधिसूचनेत म्हटले आहे की, 1000 रुपयांची पेनल्टी भरून संबंधित अ‍ॅथॉरिटीला आधारकार्डची सूचना देऊन 30 दिवसांच्या आत पॅन कार्ड पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करता येईल. अशी असेल प्रकि'या -- यासाठी सर्वांत आधी आयकर विभागाच्या ई फायलिंग संकेतस्थळावर आपल्या खात्याने लॉग इन करावे लागेल- त्यानंतर पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याच्या पर्यायवर क्लिक करावे- या लिंकवर क्लिक केल्याने तुम्हाला वैयक्तिक माहिती मागितली जाईल. सर्व कॉलम भरल्यानंतर 1000 रुपयांचा भूर्दंड भरावा लागेल- इथे तुम्ही ई-पे टॅक्सच्या माध्यमातून भूर्दंड भरू शकता. याची सूचना संबंधित आयकर विभागाला द्यावी लागेल.

.